पतंग उत्सव आणि अपघातांचा उच्चांक पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणारा नायलॉन रिल मांजा घातकच

पतंग उत्सव आणि अपघातांचा उच्चांक पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणारा नायलॉन रिल मांजा घातकच

पातूर. मराठमोळ्या मकर संक्रांत उत्सवा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात मनवला जातो परंतु या उत्सवामुळे काय परिणाम भोगावे लागतात याचा अंदाज खऱ्या अर्थाने अनुभवाला पाहिजे मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा काहीच हरकत नाही परंतु पतंग उत्सव मनवताना यामध्ये शाळकरी छोट्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची संभावना आहे आई-वडिलांनी हे गांभीर्य ओळखून आपल्या मुलांना स्वतः उपस्थित राहून पतंग उत्सव साजरा केला पाहिजे, जेणे करून होणारा अपघात टाळल्या जाईल कारण लहान मुले पतंग उत्सव मनवताना हवेतील पतंग माझ्यापासून वेगळा झाल्यावर त्याला पकडण्याकरिता मोठीं कसरत करताना आढळतात मुलांचे लक्ष हे आकाशाकडे राहते व जमिनीवर हवेत पळत सुटतात खाली काय आहे याचे कुणालाही भान राहत नाही काही मोजक्या रुपयाच्या पतंगाकरिता मुले आपला जीव सुद्धा धोक्यात टाकतात आणि वाहना च्या चपेट मध्ये येऊ शकतात किंवा खड्ड्यात किंवा घराच्या मजल्यावरून पडून अपघात होण्याची शक्यता असते त्यातल्या त्यात पतंग उडवणारे रोड वरून सुद्धा पतंग उडवताना आपल्याला दिसतात यामुळे रोडवर ये जा करणारे मोटरसायकल चालक यांच्या गळ्याला छेदून जाणाऱ्या मांजा मुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे असे अनेक अपघात सुद्धा झाले आहेत व आपल्याला दिसून आले आहेत या अशा अपघातामध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहेत मागिल काही वर्षांत आकाशामध्ये उडणारे पाखरं सुद्धा या पतंगाच्या मांज्याचे शिकार झाले आहेत मांजा मंध्ये अडकून गंभीर पने जखमी अवस्थेत आढळून आले आहेत व यामध्ये अनेक पाखरांचा जीव सुद्धा गेला आहे ग्रामीण भागात असो की शहरी भागात जिवंत इलेक्ट्रिक तारांना सुद्धा पतंग अडकतो आणि त्याला काढण्यासाठी लहान मुले जीव की प्राण कसरत करतं काठीने लोखंडी सळई ने काढण्याचा प्रयत्न करतात अशा जिवंत तारांशी खेळताना अपघात होण्याची दाट शक्यता असते आपल्या मुलांचं संरक्षण आपल्याच हाती आहे अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा व आयुष्यभर खंत राहील अशा चुका टाळणे गरजेचे आहे तर बाजारामध्ये नायलॉन मांजा हा घातक परिणाम करणारा आहे या वर बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांची आहे तर या कडे प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

किरण कुमार निमकंडे पातुर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news