वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवक आघाडी कडून भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर संपन्न
वंचित बहुजन आघाडीचे आगामी राजकीय भविष्य
तमाम युवकांचे प्रेरणास्थान माननीय सुजातदादा आंबेडकर* यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम हाती घेत वंचित बहुजन युवा आघाडी पातुर च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सस्ती येथे आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी भव्य रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते यावेळी 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच 130 गरजूंनी नेत्र तपासणी केली. यावेळी थायरॉईड शुगर सीबीसी सारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. नेत्र तपासणी करीता खडके हॉस्पिटलचे डॉक्टर अभिनव फडके* व रक्त संकलन करीता अकोला ब्लड बँक तसेच डॉ राऊत सर व सस्ती PHC स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
या शिबिराला वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर जिल्हा उपाध्यक्ष सुबोध डोंगरे वंचित बहुजन आघाडी पातुर तालुका अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ, तालुका महासचिव शरद सुरवाडे, अर्जुन टप्पे संचालक कृ उ बा समिती पातुर, राष्ट्रपाल गवई उपसभापती कृ उ बा स पातुर, पत्रकार निखिल इंगळे, मेजर अंभोरे,यांनी भेट दिली.
या भव्य शिबिरासाठी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष चंद्रकांत तायडे ता. महासचिव सुनील बंड, ता. संघटक अनिल राठोड,अनिकेत इंगळे, अक्षय उपर्वट, प्रज्वल तायडे, विठ्ठल खडके, हर्षल खंडारे यांनी अथक परिश्रम घेतले.*
*यावेळी नितीन हिवराळे , सतिश हातोले, विनय दाभाडे, विकास पाचपोर, विकास सरकटे, श्रीकृष्ण भगत, गोपाल खंडारे, मनोहर बेलोकार, किशोर घोगरे उपस्थित होते
स्वेच्छेने रक्तदान करून गरजु रुग्णाला जीवनदान देण्याचं महान कार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे युवा आघाडीने आभार मानले..