अधीक्षक अभियंता सा.बां कार्यालय समोर फटाके फोडून शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांचे अनोखे आंदोलन
गेल्या सात वर्षांपासून भ्रष्टाचाराचा कळस ठरलेल्या शेगांव पालखी रस्त्याचे ह्याम प्रोजेक्ट चे काम कासव गतीने सुरू आहे,या मार्गावर प्रवासी नागरिकांसाठी डोके दुःखी ठरत असून प्राणघातक ठरत आहे या मार्गावर अपघाताची शृंखला सुरू असून किती तरी लोकांना अपंगत्व आले आहे ,तरी हा मार्ग कासव गतीने बांधणे सुरूच आहे या बाबत शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश घोंडगे यांना निवेदनाद्वारे हा मार्ग लवकरात लवकर तयार करावा असे खूप वेळा निवेदने दिलीत त्यावर फक्त आश्वासने देण्यात आली मात्र अध्यपही हा मार्ग कासव गतीने बांधणे सुरुच आहे त्यामुळे झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उठविण्यासाठी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी आज दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या कार्यालय समोर फटाके फोडून ह्या मार्गाचा दिनांक 17 जानेवारी रोजी 8 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे “निमंत्रण पत्रिका”देत अनोखे आंदोलन केले आहे.