अकोला मनपाचे ट्विटर अकाउंट पुन्हा कार्यान्वित करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन
अकोला महानगर पालिकेचे ट्विटर खाते हे २०२१ पासून कार्यान्वित नाही , अकोला महानगर पालिका बरखास्त असून येथे कोणीही नगरसेवक पदी कार्यान्वित नाही. सर्वदूर सामाजिक माध्यमातून लोक आप आपली कामे करत असतात. अकोला शहरातील नागरिकांना महापालिका संबंधित काही समस्या तथा तक्रार असल्यास त्यांना ट्विटर च्या माध्यमाचा वापर करण्यास त्याने मदत होईल. तसेच आपण आपल्या माध्यमातून अकोला महापालिकेच्या विविध योजना व माहिती त्यावरून प्रसारित करू शकता.त्यासाठी आपण योग्य व्यक्ती च्या माध्यमातून अकोला महापालिकेचे ट्विटर खाते पुन्हा कार्यान्वित करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.