अकोला शहरातील नेहरू पार्क चौक येथे गोर सेनेचे रास्ता रोको!
अकोला शहरातील नेहरू पार्क चौक येथे आज गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदरच्या आंदोलन ची सुरुवात ही अशोक वाटिका इथून मोर्चा काढून नेहरू पार्क चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विमुक्त जाती-अ प्रगर्वात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थीवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक म्हणजेच एसआयटी लागू करण्यात यावी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अ प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा, 2017 चा रक्त नातेसंबंधीचा जीआर त्वरित रद्द करण्यात यावा, दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व व्ही जे अ प्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका व जिल्हा लिहा यादी बार्टी करून जाहीर करण्यात यावी, या व इतर मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून धरल्या होत्या. सदर रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता अडवल्याने आंदोलनकारी आक्रमक झाल्याची यावेळी पोलिसांनी बॅरिगेटिंग काढताच नेहरू पार्क चौकात शेकडोच्या संख्येने बंजारा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केला. यावेळी बंजारा समाजाच्या महिला पारंपारिक वेशभूषेत उपस्तीत होत्या. बंजारा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ अशा तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिली