कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.  – कविता व्दिवेदी मनपा आयुक्त तथा प्रशासक

कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.  – कविता व्दिवेदी मनपा आयुक्त तथा प्रशासक

अकोला दि. 16 जानेवारी 2024 –  अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये (Deep Cleaning Drive) सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील धार्मिक स्‍थळे, प्रभाग, नदी परिसर नाले, शहरातील मुख्‍य रस्‍ते, बगीचे/उद्याने सार्वजनिक शौचालये ईत्‍यादी भागांची स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे.

            अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना तसेच व्यावसायिक प्रतिष्ठान धारकांनी अकोला   महानगरपालिका व्‍दारा राबविण्‍यात येणा-या मोहीमे नंतर स्‍वच्‍छ झालेल्‍या भागांमध्‍ये कचरा         टाकणा-यांविरूध्‍द मनपा प्रशासनाव्‍दारा दंडात्‍मक करण्‍यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्‍या घरात आणि प्रतिष्‍ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात ईतरत्र न टाकता फक्‍त मनपाच्‍या कचरा घंटा गाडी मध्‍येच टाकावा.

          अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कचरा घंटा गाडी संदर्भात समस्‍या असल्‍यास त्‍यांनी अकोला महानगरपालिकेच्‍या 18002335733 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांचेशी संपर्क साधावा.

अकोला महानगरपालिका व्‍दारा शहरात सुरू असलेल्‍या सखोल स्‍वच्‍छता अभियानानंतर स्‍वच्‍छ करण्‍यात आलेल्‍या परिसरांमध्‍ये कचरा टाकतांना आढळून आल्‍यास संबंधीत प्रतिष्‍ठानधारकांवर 500 रूपये प्रति दिवस आणि घरगुती कचरा टाकणा-यांवर 250 रूपये प्रतिदिवस प्रमाणे दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे.                                                             

                                                                              कविता व्दिवेदी, मनपा आयुक्‍त तथा प्रशासक.

—————————————————————————————————————-

अकोला महानगरात (Deep Cleaning Drive) सखोल स्‍वच्‍छता मोहीमेच्‍या अनुषंगाने शहरातील विविध भागांची स्‍वच्‍छता.

अकोला दि. 17 जानेवारी 2024 –  राज्‍य शासनाच्‍या सुचनेनुसार शहर संपुर्ण पणे स्‍वच्‍छ करण्‍यासाठी शहरात सखोल स्‍वच्‍छता मोहीम (Deep Cleaning Drive) च्‍या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका क्षेत्रात चापरही झोनमधील विविध ठिकाणी सखोल स्‍वच्‍छता मोहीम सुरू असून यामध्‍ये आज सकाळी चारही झोन अंतर्गत मनपा अधिकारी कर्मचारी यांच्‍या व्‍दारे सुरू करण्‍यात आलेल्‍या सखोल स्‍वच्‍छता मोहीमेव्‍दारे आज दि. 17 जानेवारी रोजी 9.5 किलोमीटर मुख्‍य रस्‍ते, 14.78 आतील रस्‍ते, 36 मंदीरे, 5 मस्जिदी, 9.27 किलोमीटर नाले, 14 शाळा, 1 दफन भुमि, 1 स्‍मशान भुमि, 12 कच-याचे ठिकाण, नदी काठातील 2 भाग, 8 शासकीय कार्यालये, 12 खुले भुखंड, 4 बगीचे, 9 रूग्‍णालये, 1 महाविद्यालय, 2 सामुदायिक शौचालये, 7 सार्वजनिक शौचालये या ठिकाणी स्‍वच्‍छता मोहीम राबवून स्‍वच्‍छ करण्‍यात आले.

          यावेळी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी सिटी कोतवाली समोरील नाल्‍याची स्‍वच्‍छते दरम्‍यान पाहणी केली आहे.

अकोला शहर संपुणपणे स्‍वच्‍छ करण्‍याच्‍या दृष्‍टीने लोकसहभाग असणे अत्‍यंत गरजेचे असून अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, सामाजिक संघटना, स्‍वयंसेवी संघटना यांनी या सखोल स्‍वच्‍छता मोहीमेमध्‍ये सहभाग नोंदवून सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news