पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांची कार्यकाळ पुर्ण करुन बदली ! अनेक गुन्ह्याचा तपास केला उघडकीस
पातूर :- चांनी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांचे तिन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून व येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांनी बदल्याचे आदेश नुक्तेश काढले असता पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांची माना येथे नियुक्ती करण्यात आली ,चांनी पोलिस स्टेशन मधिल पोलिस उपनिरीक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे आतापर्यंत एकमेक पोलिस उपनिरीक्षक आहेत, त्यांची कामं करण्याची पद्दत सर्वानाच आकर्षक करतं होती दब्बांग पोलिस अधिकारी म्हणुन त्यांची परिसरमधील ओळख गुन्हेगाराचा कर्दन काळ म्हणून त्यांची ख्याती होति तिन वर्षामध्ये अनेक प्रकारच्या काऱ्यवाया त्यांनीं केल्या आहेत अनेक खुनाच्या तपासामधील त्यांनी तात्काळ कार्यवाही अणि पुर्ण तपास केल्याने पोलिस विभागाची मान मानेने उंचावली आहे त्या मुळे पोलिस अधीक्षक अकोला यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांना बक्षिस पत्र देऊन कौतुकाची थाप दिली आहे तर त्यांचे नाव राज्य स्तरावरील बक्षिस साथी पाठवण्यात अले असल्याची महिती विभागातून मिळाली आहे, अता पर्यन्त सर्व गावामधील शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलिस उपनिरीक्षक यांनी केले आहे , लोकांच्या समस्येला प्रथम प्राधान्य देण्याचे काम त्यांनीं केले आहे, लोकांमधील मिळून मिसळून काम करण्याची त्यांची पद्दत लोकांना भाऊक करून जात होती , राज्य भर गाजलेले विषय प्रामुख्याने विवरा येथील अंध श्राद्ध निर्मुलन तिर्डीवरून उठून बसणारे प्रकरण, आलेगाव येथील धर्म परिवर्तन बदल झालेले प्रकरण, व चोंडी येथील डॉ ने बायकोची केलेले हत्या ह्या पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी तात्काळ पोहचून प्रामुख्यानं हाताळल्या व आरोपीला जेरबंद केले, पोलिस उपनिरीक्षक यांनी घरून पळून गेलेल्या मुलींचा त्यांच्या कर्यकलंध्ये मुंबई पुणे नाशिक सोलापूर नागपूर नांदेड लातूर येथील पूर्ण शोध घेवून मुलींना घरच्यांना सुपूर्द केले , अनेक बलात्काराच्या घटनेमध्ये आरोपींचा तात्काळ अटक केली व त्यांची जेल मधे रवानगी केली, ग्रामिन भागातील चालते फिरते पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन होते. ग्रामीण भागातील कोणत्याही घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनेवर जाण्याचे त्यांचे कार्य असायचं, नंतर सर्व परीस्थिती समजून लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनीं केले, त्यांच्या कर्यकालामध्ये कोणत्याही अमिषाला व दबावाला बळी न पडता त्यांनी जनतेला न्यान देण्याचं काम केले.ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनीं केले, तरुनांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचे कार्य त्यांनी केले.खरोखर सदरक्षणालय खलानिग्रणालय या शब्दा चें नावाप्रमाणे त्यांनी आपले करतव्य पार पाडले आहे. चांनी पोलिस स्टेशन हे अतिशय ग्रामीण भागातील पोलिस स्टेशन येत असल्यामुळे चान्नी पो स्टे येथे अधिकारी वार्गाची कामं करण्याची मनस्थिती होत नाही. माञ पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी आपल्या परिवारासह येथे राहून आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा