नगरपरिषद पातुर येथे राम मंदिर आणि स्वच्छता या विषयावर शहरातील सर्व धर्मीय संस्थानिकांच्या बैठकीच्या आयोजन
पातुर शहरातील विकासाला साथ देण्यासाठी महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या नगरपरिषद पातुर तर्फे येत्या 22 जानेवारीला होऊ घातलेला राम मंदिर सोहळा तथा धार्मिक स्थळा जवळील स्वच्छता या विषयावर पातुर शहरातील सर्व धर्मीय संस्थांच्या सदस्याची बैठक दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती यामध्ये विशेष करून 22 जानेवारी रोजी राम मंदिर सोहळ्याला आपल्या शहरातील सर्व मंदिरावर रोषणाई करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडून सूचना करण्यात आल्या तथा शहरातील विविध समस्या जाणून घेण्यात आल्या धार्मिक स्थळा जवळील केरकचरा संबंधी काही समस्या असल्यास त्वरित मुख्याधिकारी सय्यद ऐसा नुद्दीन यांच्याशी संपर्क साधावा असे मुख्याधिकारी यांच्याकडून सर्व संस्थानिकांना सांगण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता महेश राठोड बांधकाम लिपिक घोडे अभियंता आशिष भगत स्थापना लिपिक सदस्य मुदस्सीर तथा नपचे बंडू पाटील राहुल अत्तर कार आणि शहरातील सर्व संस्थानिकांचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते