मित्र पक्षच देणार मित्रपक्षाला फटका?
अकोला – अकोल्यात शिवसेना शिंदे गटाला गळती लागली आहे?..शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख संदीप पाटील यांनी शिवसेनेला राम राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांनी अजित पवार आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील नेतृत्वच कमकुवत असल्यामुळे त्या ठिकाणी काम करायला फार अडचण जात असून कार्यकर्त्यांना न्याय दिला जाऊ शकत नव्हता हे कारण देत त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे असे संदीप पाटील यांनी यासंदर्भात स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटाला फटका बसणार आहे? असा पत्रकार परिषदेच्या पत्रात स्पष्ट नमूद केलं आहे. त्यामुळे मित्र पक्षातच फूट पडल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. म्हणून येत्या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांना किती मदत करतील हे वेळच सांगेल.