पोलीस अधीक्षकांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद!

शहरातील गावगुंडांचा कठोरपणे बंदोबस्त करण्या सोबतच आता थेट विद्यार्थी व कोचिंग क्लास संचालकां सोबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी साधला पोलीस लॉन येथे विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका निष्पाप १८ वर्षीय विद्यार्थ्यांच्या हत्येने जिल्हा हादरुन गेला होता. याप्रकाराची अतिशय गंभीर दखल घेणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गावगुंडांचा कठोरपणे बंदोबस्त करण्या सोबतच आता थेट विद्यार्थी व कोचिंग क्लास संचालकां सोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आज शनिवारी दुपारी बारा वाजता पोलीस लॉन मधील राणी महल येथे हा संवाद साधला यावेळी शाळा, महाविद्यालयां सह खासगी शिकवणी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांही जाणून घेतल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अकोल्यात दाखल होतात व शिकवणी वर्गाची सर्वाधिक संख्या सिव्हील लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. त्यामुळे साहजिकच, या भागात बाराही महिने विद्यार्थ्यांचा किलबिलाट शहरातील शाळकरी विद्यार्थी, तरुणी व महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नाही. विद्याथ्यांसह शिकवणी संचालकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशातूनच हा संवाद साधला. यावेळी बच्चन सिंग पोलीस अधीक्षक, अकोला यांनी शेकडो विद्यार्थ्यांच्या समवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर दामिनी पथक प्रमुख यांच्यासह भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक व शहरातील सिटी कोतवाली आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि कोचिंग क्लासेस संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.