राम लल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा उत्सव अनुषंगाने अकोल्यात हरिहर पेठ येथून काढण्यात आला पोलिसांचा रूट मार्च
राम लल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत असून अकोल्यातही त्या निमित्ताने उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई पोलीस कर्मचार्यांनी हरिहर पेठ येथून जय हिंद चौक दगडी पूल जनता भाजी बाजार मार्ग,गांधी चौक मार्गे सिटी कोतवाली पर्यंत रूट मार्च काढला यामध्ये शस्त्रधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बिट मार्शल, पोलिस वाहनांचा यामध्ये समावेश होता.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही तत्पर आहोत,कायदा सुव्यवस्था बिघडवू नका,शांतता कायम ठेवा असा संदेश देत आज दिनांक 20 जानेवारी सायंकाळी 7 वाजता पोलिसांनी रूट मार्च काढीत शक्तिप्रदर्शन केले.