नाल्यात साचलेल्या कचऱ्याने घेतला पेट टॉवर चौकातील चप्पल दुकान आग लागता सुदैवाने बचावले!
सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील धार्मिक स्थळे, प्रभाग, नदी परिसर नाले, शहरातील मुख्य रस्ते, बगीचे/उद्याने सार्वजनिक शौचालये ईत्यादी भागांची स्वच्छता करण्यात येत फक्त फोटो सेशनपूर्ती साफसफाई करण्यात येत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ठीक साचले असून मुळात जशी पाहिजे तशी साफसफाई होत नसल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास
टॉवर चौक संकुलातील जनता भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या चप्पल दुकानासमोरील नाल्यातून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे कॅम्पसमध्ये काही काळ एकच खळबळ उडाली होती. तसेच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले मात्र आग इतकी भीषण नव्हती, धूर निघत होता जो स्थानिक नागरिकांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आला. नाल्यात मोठ्या प्रमाणात साठलेल्या कचऱ्याला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे समोरील चप्पल दुकान सुदैवाने बचावले. अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. तसेच शहर कोतवाली पोलिसांचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.