जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन!
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन नुकताच मराठा आरक्षण सर्वेक्षण मनुष्यबळ उपलब्ध करून देणेबाबत जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शिक्षकांना शासनाने जिल्ह्यातील काही ठराविक शाळा त्यांनी या सर्वेक्षणायक करता घेतले आहेत त्या शाळांचे सर्वच कर्मचारी घेतल्यामुळे शाळा आता दहा दिवस बंद राहणार की काय! असा प्रश्न मुख्याध्यापकांना निर्माण झाला असून माध्यमिक शाळा विनाअनुदान शाळा कॉन्व्हेंट शाळा असून सर्व शाळांचे कर्मचारी एक किंवा दोन सर्व शाळा सुरू राहतील शाळा बंद राहणार नाही परंतु नियोजन करीत असताना चुकीचे नियोजन केल्यामुळे अनेक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांसमोर समस्या निर्माण झाली आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी अकोला यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेमधील एक किंवा दोन जर कर्मचारी घेतले तर हे योग्य नियोजन होऊ शकते ह्या संदर्भात आयुक्त मनपा अकोला आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी राज्य मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्षबळीराम झांबरे शहर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्रकाश डवले सचिव माधव मुळशी जिल्हा उपाध्यक्ष आनंद साधू विदर्भ महिला प्रतिनिधी नीलिमा वैराळे जिल्हा महिला अध्यक्ष वाजगे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.