डाबकी रोड येथे 251 किलोचा महानैवद्य रामप्रसाद लाडू बनविण्याची तयारी

डाबकी रोड येथे 251 किलोचा महानैवद्य रामप्रसाद लाडू बनविण्याची तयारी

अकोला :- दि 20 : श्री जानकी वल्लभो सरकार धर्मांथ संस्था आणि स्वर्गीय श्री अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान यांचा वतीने राज राजेश्वर ग्रामदैवत यांना आमंत्रित करून 14 नद्यांच्या जलाने राजस्थान येथून गाई च्या तुपाने 251 किलोचा महा नैवेद्य रामप्रसाद लाडू डाबकी रोड येथील मुरली स्वीट मार्ट येथील कारागिरांनी विशेष पूजा अर्चना करून तयार केला आहे

अयोध्या धाम येथील ऐतिहासिक भव्य राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा च्या सोहळ्यानिमित्त 251 किलोचा रामप्रसाद लाडू राम भक्तांच्या सेवेत महानैवेधच्या स्वरूपात अर्पण होणार आहे
या 251 किलोच्या रामप्रसाद लाडू बनवण्यासाठी मुरली स्वीट मार्ट चे संचालक निलेश निनोरे आणि त्यांच्या 5 कारागिरांनी 14 तासात या महा नैवेद्याची तयारी साठी प्रभू राम भक्ती आणि श्रद्धेने सहभाग घेतला आहे

अकोल्यातील प्राचीन मोठ्या राम मंदिरा समोर श्रीराम मंदिराची कलाकृती व श्री गजानन महाराजांच्या पावस स्पर्शाने पवित्र श्रीराम पादुका व श्री राम ललाचे राम बाल स्वरूपाचे दर्शन महाआरती मोठ्या राम मंदिरात समोर दिनांक 22 जानेवारी सोमवार रोजी 12 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे तसेच या आरतीनंतर या रामप्रसादाचे वितरण होणार आहे

यावेळी श्री राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील अधिवक्ता वकील यांची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमीची इतिहास काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास याचे फलक नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने श्री जानकी वल्लभ सरकार धर्मा संस्थेचे अध्यक्ष अनिल मानधने यांच्या कल्पनेतून नवीन पिढीला आणि युवा पिढीला माहिती व्हावी यासाठी लावण्यात येणार आहे

महाआरतीनंतर रामप्रसाद वितरण होणारा आहे जानकी वल्लभो सरकार धर्मांथ संस्था समितीचे अध्यक्ष अनिल मानधने संजय जीरापुरे गिरीश जोशी निलेश निनोरे गिरीराज तिवारी हिम्मत चौधरी गणपत चौधरी विष्णू चौधरी विलास काका निनोरे राज राजेश्वर मंदिराचे ट्रस्टी गजानन घोंगे संजय अग्रवाल अशोक तोष्णीवाल संतोष गोयंका सतीश गोयंका नानक राजपाल राजू भाटी गौरव शर्मा अनिल शर्मा सुनील शर्मा तसेच रामनगर मित्र मंडळ चे कार्यकर्ते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news