अकोला शहरातून वाहणाऱ्या नदीकाठच्या एका भंगाराच्या दुकानात आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील पृष्ठ आणि भंगार साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. मात्र आगीने दुकान पूर्णपणे जळून खाक होऊन लाखीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.