शतकांची प्रतीक्षा संपली आज पातुर शहर राममय झाले, पातुर शहर एक ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक

शतकांची प्रतीक्षा संपली आज पातुर शहर राममय झाले, पातुर शहर एक ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक

पातूर शहरातील विविध संघटनांनी पातूर शहरात शतकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिनी दीपावली साजरी केली पातुर शहरातील प्रत्येक घराघरांमध्ये दीप प्रज्वलन करून श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पातुर शहरातील ऐतिहासिक खडकेश्वर परिसरामध्ये असलेले श्रीरामांचे मंदिर पतदिव्यांनी व आकर्षक लाइटिंग ने सजवण्यात आले तर महाआरती पातुर शहरातील प्रत्येक मंदिर परिसरात करण्यात आल्या यावेळी प्रभू श्रीरामाचे व लक्ष्मण, सीता, रामभक्त हनुमान यांच्या भूमिका बाल कलाकार. श्री रवि हिरळकार, साई रवि हिरळाकार, बालिका श्रेजा गणेश निमकंडे, तर हनुमान यांच्या भूमिकेत निरज किरण कुमार निमकंडे या लहान चिमुकल्या मुलांनी सादर केल्या व आकर्षक ठरले व समंस्त पातुर शहरातील तपें हनुमान व्यायाम शाळा, सिदाजी महाराज व्यायाम शाळा, पिंपळेश्वर व्यायाम शाळा, महात्मा फुले भाजी बाजार समिती, जय भवानी व्यायाम शाळा तेलीपुरा, संभाजी ग्रुप, बजरंगी ग्रुप, नवयुवक मंडळ गुजरी लाईन, जय बजरंग फ्रेंड्स क्लब, हिंदुस्तानी फ्रेंड्स क्लब, हिंदू खाटीक महासंघ, छत्रपती शिवाजी महाराज पंच मंडळ, विर भगतसिंग मंडळ शनिवार पुरा, हिंदू सेना व्यायाम शाळा पाटील मंडळी, स्वराज मित्र मंडळ, कासार वेटाळ, संत श्री सिदाजी महाराज पंच मंडळ, कवळेश्वर भजन मंडळ, खडकेश्वर व्यायाम शाळा, बालाजी मंदिर पंच मंडळ, माऊली मित्र मंडळ गुरुवार पेठ, तुळजाभवानी संस्थान गुरुवार पेठ भंक्त परिवार , या सर्व संघटनांनी पताके, झेंडे, लायटिंगच्या रोषणाईने आपापले परिसर नयनरम्य भगव्या झेंड्याखाली सजवण्यात आले तर विविध संघटनांनी मोतीचूरचे लाडू, बूदी वाटप, मिठाई वाटप केली अशाप्रकारे पातुर शहरात अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिनी दीपावली साजरी करण्यात आली

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news