माजी सैनिकांनी स्थापन केलेली वीरो के वीर इंडियन पार्टी निवडणूक मैदानात
अकोला- राष्ट्रांची भूमी हे वीरांची भूमी असून राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा वीर आहे. मात्र आता राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने हे वीर पण समाप्त झाले असून देश हा विचित्र अराजकतेच्या उंबरठावरआला आहे. रात्र दिवस उन्हातानात देशाचे रक्षण करणारे सैनिक हे या देशाची शान असून त्यांच्या व सामान्य नागरिकांच्या संदर्भात राजकीय पक्ष कोणत्याही उपाययोजना करीत नाही.किंबहुना तो विकासात अयशस्वी झाला आहे. म्हणून फौजी व सामान्य नागरिकांच्या सर्व कष्ट कल्याणसाठी विरो के विर इंडियन पार्टी देशभरात लोकसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असून अकोला लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने आपण निवडणूक रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती वीरो के वीर इंडियन पार्टीचे पदाधिकारी, माजी लष्करी अधिकारी एड रामभाऊ खराटे यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात मंगळवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत वीरो के वीर इंडियन पार्टीची माहिती देण्यात आली.पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई बोदर तथा राष्ट्रीय महासचिव केतनभाई परमार यांच्या कुशल नेतृत्वात नवगठीत वीरो के विर इंडियन पार्टी माजी लष्करी अधिकारी व सैनिकांचे सशक्त संघटन आहे. राष्ट्रातील मतदारांनी आतापर्यंत अनेक जाती धर्माच्या नेते मंडळी व पक्षांना संधी देऊन त्यांना सत्तेत बसविले आहे. आता नव्या दमाने फौजींची विरोके वीर इंडियन पार्टी नागरिकांच्या सेवेसाठी निवडणुकीच्या मैदानात उभी राहणार असेल राष्ट्रात ऐतिहासिक बदल या माध्यमातून करण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी नागरिकांनी अशा नवगठीत पक्षाला शुभाशीर्वाद प्रदान करावे असे आवाहन एड खराटे पाटील यांनी यावेळी केले. यावेळी विरो के वीर इंडियन पार्टीचे अनेक पदाधिकारी व सेवानिवृत्त सैनिक उपस्थित होते.