जीवा भावाची माणसे जवळ असने हीच खरी श्रीमंती – डॉ. अभय पाटिल
साईनगर दुर्गा चौक शिवसेना वसाहत येथे 134 युवकांनी केले रक्तदान
अकोला – स्थानिक साई नगर दुर्गा चौक शिवसेना वसाहत येथे डॉ. अभयदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर मध्ये 134 युवकांनी रक्तदान दिले. कार्यक्रमाला सर्वप्रथम डॉ.अभयदादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाशभाऊ तायडे, मनपाचे माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख राजू मिश्रा, ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारस्कर, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीचे (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष अनिल मालगे, सामाजिक कार्यकर्ता महादेवराव बोरकर, अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कपिल रावदेव, गजानन घुसे, नंदकिशोर गावंडे, पुरुषोत्तम चौधरी, वासुदेवराव दादंळे, रामकृष्ण कुचर, बंडु शिरसागर, अजीज भाई उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी डॉ.अभयदादा पाटील यांनी रक्तदान करणारे युवक यांचे व आयोजकांचे आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी कार्यक्रमाला उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.रक्तपेठी डॉ.बि.पी.ठाकरे यांच्या टीमचे सहकार्य लाभले. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन चंद्रकांतभाऊ बोरकर,गणेश भाऊ कळसकर, विनोद मराठे, मंगेश वानखडे यांनी केले होते. या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला आशु भाऊ वानखडे, किशोर गणेशकर, अमर भगत, विठ्ठल नांदुरकर,सुनील बाटे, संतोष आखरे, आकाश हरसुलकर, राहुल कानडे, अक्षय नागलकर, राजकुमार शिरसाट, दिगंबर भोयर, राजू चोपडे, बालू ठाकरे, बाबाराव अंधारे, संतोष पाचपोर, आशु तिवारी, हरीश सांगळे, उमेश टेकाडे, आकाश शिंदे,हरीश महल्ले,प्रमोद मराठे, पंकज कदम, चंद्रकांत महाजन, गोकुल सांगे, पवन वाडेकर, संदीप मराठे, राजेश सावळे, राजू चव्हाण, राहुल सारवान, दिलीप ठाकूर, नारायण मेसरे, अजय गणेशकर, शुभम नागलकर, कमलेश भरणे, प्रवीण गीते, मंगेश गणेशकर, गणेश पिंडाले तेजस वानखडे यांच्यासह सर्वांचा सहकार्य लाभले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.