प्रेमसंबंधातूनच वाद विकोपाला जाऊन हत्या माना येथील घटना !

प्रेमसंबंधातूनच वाद विकोपाला जाऊन हत्या माना येथील घटना !

दोघांचेही फोनवर अनेकदा बोलणे व्हायचे यामधून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेमसंबंधातूनच वाद विकोपाला जाऊन हत्या हत्या झाल्याची घटना मुर्तीजापुर जवळ असलेल्या माना येथील अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीचा खून करून चाकूने स्वतःचाही गळा कापल्याची घटना काल मंगळवार, २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली.

पोलीस सूत्रानुसार, २३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अकोट तालुक्यातील लोहारी येथील प्रियकर अनिल श्रीकृष्ण तायडे (४५) हा युवक शोभना गजानन लांडे (३६) हिच्या घरी आला. यावेळी त्याने सदर महिलेला शरीरसुखाची मागणी केली असता दोघांमध्ये वाद झाला. या वादाज प्रियकराने या महिलेच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. एवढ्यावर तो थांबला नाही तर
महिलेच्या शरीरावर व पोटावर चाकूचे असंख्य वार केल्यानंतर ती मृत झाल्याचे समजून त्याने स्वतःवर त्याच चाकूने वार करून स्वतःचा गळा कापून घेतला. यावेळी दोघांचा आरडाओरडा रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या लक्षात आला असता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो दरवाजा उघडला नसल्याने दरवाजामागची लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करून दरवाजा उघडला असता, उपस्थितांना खुनाचा थरार पाहावयास मिळाला.

अनिल तायडे हा वर्षातून कित्येकदा शोमना हिला भेटासाठी माना येथे येत होता. दोघांचेही फोनवर अनेकदा बोलणे व्हायचे यामधून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेमसंबंधातूनच वाद विकोपाला जाऊन हत्या झाली असावी, अशी नागरिकांत चर्चा आहे. याबाबत माना पोलीस स्टेशनला माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अकोला येथील फॉरेन्सिक टीमला बोलावून मूर्तिजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे व माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, जय मंडावरे, पंकज, सरोदे, पंजाबराव इंगळे, इरफान व इतर सहकारी चौकशी कामात सहभागी होते. माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे माना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news