माजी पंचायत समिती सदस्याचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश
वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीला अंगीकृत करून तथा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक समाज माणसाविषयी असलेल्या राजकीय दृष्टिकोनातून आदिवासी समाजातील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष खुळे यांनी समाज बांधव निलेश करवते सुधाकर लठाड नंदू गिरे अमित ताजने प्रदीप डाखोरे यांच्या मार्गदर्शनात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये यशवंत भवन अकोला येथे प्रवेश घेतला त्यासोबतच राजाराम खुळे सुखनंदन गाढवे मंगेश गाढवे संदीप डाखोरे रमेश झळके सोमदास झाटे या समाज बांधवांनी प्रवेश घेतला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ प्रसिद्ध प्रमुख दिनेश गवई हे उपस्थित होते