एल्गार मराठा आरक्षणाचा पातूर तालुक्यातील मराठा समाजाचे मुंबई कडे प्रस्थान
पातूर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पातुर तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील सखल मराठा समाज हा मराठा समाजाचे नेतृत्व घेऊन उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्या करिता मुंबई येथील 26 जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा उपोषण करीता पातुर तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील पातुर शहर येथून रवानगी झाली आहे तर गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2023 रोजी मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील हे पातुर तालुक्यातील चरणगाव येथे सभेला उपस्थित झाले व या सभेमध्ये सखल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदविला तर मुंबई येथील 26 जानेवारी रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा भाग होण्यासाठी पातुर तालुक्यातील सखल मराठा समाज आज मुंबई कडे रवाना झाला आहे राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पातुर तालुक्यातील जवळपास एक हजार सखल मराठा समाज हा काही दिवस लागणाऱ्या दैनंदिन सुविधांच्या साहित्या सह मुंबई कडे रवाना झाले आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा