प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने एक पाऊल ‘ती’ च्यासाठी

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने एक पाऊल ‘ती’ च्यासाठी

खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आपण स्वातंत्र्याच्या शूरवीरांची आठवण काढत भारत मातेला नमन करत असतो आपल्याला सुद्धा देशाचा देणं असतं अशातच सार्वजनिक ठिकाणी महिलांचे स्वच्छतागृहाची कुचंबना या देशाला नवीन नाही बरेचदा लघुसंखेसाठी महिलांना अशा ठिकाणी व्यवस्थाच नसते ज्या ठिकाणी सर्व दूर पुरुष वर्ग हजर असतो त्यामुळे बरेचदा त्यांच्या आरोग्यावर त्याचे अनिष्ट परिणाम देखील होताना दिसतात आपण केवळ नवरात्रात महिला शक्तीचा जागर करणे म्हणजे ती च्या ऋणातून उतराई होणे असते का आपण आपल्या साध्या साध्या प्रयत्नाने देखील तिचे ऋण फेडवु शकतो आणि याची जाणीव ठेवत खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी पासून पातुर शहरालगत असणाऱ्या प्रमुख रस्त्यावर महिलांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे पातूर शहराला लगत असलेले बाळापुर ते हैदराबाद नॅशनल हायवे त्यानंतर अकोला हैदराबाद मार्गावर काही अंतरावर ठिकठिकाणी महिलांसाठी ही व्यवस्था रस्त्याच्या कडेला लागून केली आहे. लांबच्या प्रवासी महिलांना सुविधा उपलब्ध होईल याकरिता खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाला पातूर तहसीलदार रवि काळे व पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके साहेब यांनी भेट दिली व खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळातील सदस्य व कार्यकर्त्यांना या संकल्पनेविषयी स्तुती करत युवकांना मार्गदर्शन केले व देशभक्ती प्रत्येक सामान्य माणूस करू शकतो असा संदेश ठाणेदार किशोर शेळके यांनी दिला आहे या वेळी पत्रकार किरण कुमार निमकंडे,, निखिल इंगळे, यांची उपस्थिती होती.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news