महामार्गावर अपघात अपघातात युवक गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्गावर अपघात अपघातात युवक गंभीर जखमी

 बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील बनारसी धाब्याजवळ अपघातामध्ये एका वीस वर्षे युवक गंभीरित्या जखमी झाला आहे.

गणतंत्र दिनाच्या दिवशी सकाळी अकोला येथील सलून व्यावसायिक प्रतिक राजेश बोपुलकर रा.कमळनी मुर्तिजापूर हे अकोल्यावरून आपल्या मूळ गावी कमळणी तालुका मूर्तिजापूर येथे जात असताना सकाळी नऊ वाजता बोरगाव मंजू समोरील बनारसी धाब्याजवळ त्यांच्या टू व्हीलर गाडीचा अपघात झाला टू व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या साईडला पडली यामध्ये टू व्हीलर चालक युवक प्रतिक राजेश बोपुलकर वय २० हे गंभीरित्या जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक हे अकोला येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या खाजगी वाहनांमध्ये त्या गंभीररित्या जखमीला घेऊन अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती यावेळी आपत्कालीन बचाव पथकाचे रंजीत घोगरे, योगेश विजयकर यांच्यासह टीम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news