भोपळे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भोपळे विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा

हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद भोपळे, सुनील राऊत,कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे संचालिका अन्नपूर्णाबाई बंड संचालक वीरेंद्र भोपळे प्रकाश खोब्रागडे शिवशंकर मार्के संस्थेचे आजीवन सदस्य सुभाष राऊत सहकार्यवाह स्नेहल भोपळे प्राचार्य संतोषकुमार राऊत माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उमेश टापरे पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी विनोद ताळे सत्यदेव तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सामुहिक कवायत देशभक्तीपर गीत गायन व नृत्यांचे सादरीकरण केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे व कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करित संस्थेचे वतीने संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सोयी सुविधा यासह शासकीय विविध योजना शिष्यवृत्तीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले या समारंभाचे संचलन प्रा. निखील भड व मयूर लहाने यांनी केले. शाळेचे पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी उपस्थितीचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्यगण पत्रकार उपस्थिती होते. या समारंभाच्या यशस्वीकरिता जेष्ठ शिक्षक रंजित राठोड व प्रा. निलेश गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक प्रशांत भोपळे स्वप्नील गिऱ्हे अभिजित भोपळे सुनील वाकोडे निलेश कासोटे अमोल दामधर प्रा.हरिविजय दुधे अमोल येऊल, श्रीकांत परनाटे सचिन दही गजानन खारोडे गणेश भोपळे जगदीश पवार पद्मा टाले प्रा.दुर्गा बोपले आरती इंगळे प्रतिभा चोपडे अश्विनी टाले व कर्मचारी वृंद रामकृष्ण भड अंबादास चाफे निलेश दांडगे अक्षय मोरखडे नितीन शर्मा पूजा धूरदेव यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news