प्रजासत्ताक दिनी तुळसाबाई कावल विद्यालय येथे ध्वजारोहण संपन्न
तुळसाबाई कावल विद्यालय येथील एनसीसी महाराष्ट्र 11 बटालिय चे विद्यार्थी यांनी भारतीय लष्कराचे शौर्य प्रदर्शन केले व आकर्षक ठरले.
पातूर शहरातील गेल्या स्वतंत्र काळापासून भारतीय स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वर्षभर शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये शाळेचे नाव व विद्यार्थ्यांचे नाव लौकिक करतात अशा विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन स्वातंत्र्यदिनी सन्मानित केल्या जाते यामध्ये मदर इंडिया कॉमेंट चे चिमुकले विद्यार्थी सुद्धा आपल्या शाळेबद्दल व देशाविषयी संदेश देतात या वेळी तुळसाबाई कवाल विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा बेरार एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष विजय सिंह गहिलोत सर व बेरार एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती स्नेह प्रभादेवी गहिलोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तुळसाबाई कावल विद्यालय येथील एनसीसी 11 महाराष्ट्र बटालियन चे विद्यार्थी यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड चे प्रदर्शन केले व आकर्षक ठरले तर एनसीसी 11 महाराष्ट्र बटालियन च्या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कर सैन्यात सीमेवरील होणाऱ्या चकमकीचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली महाराष्ट्र बटालियन एनसीसी 11 कॅडेटचे प्रमुख सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केले या वेळी बेरार एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष विजय सिंह गहिलोत सर व बेरार एज्युकेशन सोसायटी सचिव श्रीमती स्नेह प्रभादेवी गहिलोत मॅडम तसेच तुळसाबाई कावल विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन सिंह गहिलोत, उप प्राचार्य वाशिंमकर मॅडम , मदर इंडिया कॉमेंट चे मुख्याध्यापक खंडारे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व या वेळी पातुर शहरातील ज्येष्ठ नागरिक , माजी शिक्षक, पालक वर्ग,, पत्रकार उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा