प्रजासत्ताक दिनी पातुर तहसीलदार यांनी केले ध्वजारोह
भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ध्वजाला दिली मानवंदना
पातूर तहसील कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त पातूर तहसीलचे तहसीलदार श्री रवी काळे यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली तर पातुर तालुक्यातील तुळसाबाई कावल विद्यालय येथील एनसीसी 11 महाराष्ट्र बटालियन चे विद्यार्थी यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड चे प्रदर्शन केले तर या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलातील सैन्यांचे देशविरोधी घटकांच्या विरोधात युद्ध लढण्याची चित्त थरारक प्रदर्शनी करून उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी तालुक्यातील विविध शाळकरी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी सैनिक, पातुर पंचायत समिती सभापती सुनीता ताई अर्जुन टप्पे, उपसभापती इम्रान खान, शहरातील पत्रकार, पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार , उपनिरीक्षक अधिकारी, शहरातील ज्येष्ठ नागरिक, यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा