वादग्रस्त कृषी सेवा केंद्राचा संचालक उठला शेतकऱ्यांच्या जिवावर दाळंबीच्या शेतकऱ्यांनाही करावी लागली दुबार पेरणी
अकोला- शेतकऱ्यांना बोगस औषधी द्रव देऊन शेतकरी यांना नुकसान करणाऱ्या येथील कृषी सेवा केंद्राच्या संचालकाचा आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे.
नजीकच्या दाळंबी येथील शेतकरी यांना चुकीचे औषध दिल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुरणखेड येथील आनंद ट्रेडिंग कृषी सेवा केंद्र या नावाने कृषी सेवा केंद्र असून या केंद्रावर उच्च दराने औषधी विकणे खत साठवून ठेवणे असे अनेक आरोप असल्याची चर्चा आहे असे असताना कुरणखेड येथील शेतकरी योगेश विजयकर यांनी केलेल्या तक्रारीचे प्रकरण प्रलंबित असताना दाळंबी येथील शेतकरी अंगद वरोकार, चंद्रकांत वरोकार, यांनी सुधा तक्रार केली या संदर्भात तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती तथा कृषी अधिकारी पंचायत समिती यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन त्यांनी पाहणी केली या शेतकऱ्यांना सुद्धा चुकीची सल्ला दिल्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागली यामध्ये या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.