म्हैसांग येथे गळ फास घेऊन ऐका तरुणाची आत्महत्या

म्हैसांग येथे गळ फास घेऊन ऐका तरुणाची आत्महत्या

म्हैसांग येथील ऐका 32 वर्षीय युवकाने गळ फास घेऊन जीवन संपविले हि घटना शनीवारी 27 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास हि घटना उघडकिस आल्याने संपुर्ण परिसरास खडबड उडाली.
बोरगांव मंजु पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथील निलेश रमेश डगवाल 32 वर्ष युवकाचे अपघातात हात पाय फॅक्चर झाल्याने 27 जानेवारी रोजी दुपारी 4 च्या वाजता च्या सुमारास आपल्या राहत्या जुन्या घराच्या घरी गोट्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली . याप्रकरणी सदर घटना दुपारी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आल्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन यांना घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आणि शेवविच्छेदनासाठी मृतदेह अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे..
सदर युवक हाताने सक्षम होता मात्र एका अपघातामध्ये त्याचा हात आणि पाय फॅक्चर झाल्यामुळे त्याच्या कडून कोणतेही काम होत नसल्याने आणि कुटुंबावर उपजीविका असल्याने त्याचे शल्य मनात बोचत असल्याने व शारीरिक अकार्यक्षमता झाल्याने सदर युवकांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याने संपूर्ण परिसरात दुःखाची शोक कळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news