वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने घुसणाऱ्या तीन शिकाऱ्यांना गावठी बंदुकीसह अटक!
धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या महान वन बीट कार्यक्षेत्रात २६ जानेवारीला वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने सावर तलावाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आरोपी सय्यद अबरार सय्यद अन्सार, जावेदखान रहीम खान, रशीद शाह लतीफशाह यांना वनविभागाच्या पथकाने पकडले. गुन्ह्याची खात्री झाल्यावर रात्री तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाल व काळ्या रंगाची हातभट्टी बंदूक, कुऱ्हाळ, एक डबा खुले बारूद, २८० नग छर्रे, लोखंडी रॉड, सुरा, कथिल, पांढरे बोरे, फटाके, विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, तीन मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर वन अधिनियमानुसार विविध कलमान्वयेगुन्हा दाखल केला असून, २७ जानेवारीला बार्शीटाकळी दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली आहे . वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या महान बीटमधील जंगलात २६ जानेवारीला वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने घुसणाऱ्या तीन शिकाऱ्यांना गावठी बंदुकीसह अटक करण्यात आली आहे.