भारतीय जनता पार्टी, अकोला महानगरच्या वतीने “नमो चषक” अंतर्गत नमो महा मॅराथॉन संपन्न
28 जानेवारी रोजी अकोला आरोग्यासोबत आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता नमो चषक चे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये समाजातील सर्व घटक सहभागी झाले होते.अकोला महानगरामध्ये “नमो महा मॅराथॉन” खेळाचे आयोजन वसंत देसाई स्टेडीयम, रेल्वे स्टेशन रोड येथून सकाळी 7.00 वा सुरवात करण्यात आली होती यात 500 विद्यार्थी सहभाग दर्शविला होता. सदर मॅराथॉन वसंत देसाई स्टेडीयम .रेल्वे स्टेशन.गुरुद्वारा ब्रिज. शिवाजी पार्क. अकोट स्टँड. संतोषी माता मंदिर.अग्रेसन चौक.दुर्गा चौक. जठारपेठ चौक.सातव चौक . टिळक पार्क . जिल्हा न्यायालय मार्ग ते वसंत देसाई स्टेडीयम येथे संपन्न झाली . यावेळी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात विजय अग्रवाल. जयंत मसने, किशोर पाटील.महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे,कृष्णा शर्मा,महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे,डॉ.अभय जैन,सिद्धार्थ शर्मा,विनोद मनवानी,नाना कुलकर्णी,संतोष पांडे युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले,नगरसेवक राहुल देशमुख,हरीशभाई अलीमचंदानी,राजेंद्र गिरी,उमेश गुजर,अमोल गीते,अभिषेक भगत,रमेश करिहार,संजय झाडोकार,हर्ष चौधरी आधी प्रामुख्याने उपस्थित
सदरनमो महा मॅराथॉन मध्ये महानगर पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, मंडळ सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.