युवासेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर यांनी वाचविले ५० गायीचे प्राण !
रविवार दि.२८ एका खाजगी कामा निमित्त समृद्धी महामार्गाने नागपूर कडे जात असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ट्रक मध्ये कोंबून ५० गायींना कतली साठी नेत होते. तेव्हा त्या ट्रक चा त्यांनी पाठलाग केला व त्यानां नागपूर जवळ पकडले पोलिसांच्या ताब्यात दिले.!
यावेळी उपस्थितांशी संवाद साधत गोहत्या बंदी कायदा मंजूर झालेला असल्यामुळे गोहत्या करणार्यांप्रमाणेच कसायाला गायी..
बैल विकणारेसुद्धा दोषी आहेत असे सांगून आपल्या भाकड गायी बैलांना न विकता त्यांची सेवा करण्याचे शेतकरी पशुपालकांना आवाहन केले.यावेळी हिंगणा नागपूर पोलीस स्टेशनमध्ये आदी शिवसैनिक उपस्थित होते. खऱ्या अर्थाने निखिल भैय्या ठाकूर यांचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचा मावळा असल्याचा अभिमान वाटला.