काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कारवाई…अकोला शहर वाहतुक नियंत्रण शाखेची कारवाई
काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कलम १०० (२)/१७७ मोवाका अन्वये विशेष मोहीमे अंतर्गत कारवाई
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आदेशानुसार शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व संपूर्ण जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत (Tinted Glasses/Black film) काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कलम १००(२)/१७७ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण अकोला जिल्हयात दिनांक २३/०१/२०२४ ते २८/०१/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली.
सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील वाहतुकीचे काम पाहणारे पोलीस अमंलदार यांचे मार्फत (Tinted Glasses/Black film) काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कलम १०० (२)/१७७ मोवाका अन्वये एकुण ५०४ केसेस करून १,३४,०००/- रू दंड आकारण्यात आला असुन त्यापैकी १,०५,५००/- रु दंड वसुल करण्यात आला आहे..
वाहन चालवितांना चार चाकी वाहनांचे काचावर डार्क काळी फिल्म लावु नये तसेच वाहनांचे कागदपत्रे सोबत बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे.