पोलीस हवालदार अरुण चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे वाचलेले प्राण!
अकोला रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून ट्रेनच्या खालती पडत असताना जीआरपीएफ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्क प्राण वाचलेल आहे. काल दिनांक 28 जानेवारी च्या रात्री पावणे बाराच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक एक आलेल्या काझीपेठ पुणे एक्सप्रेस चालत्या ट्रेनमध्ये कृष्णा गजानन घोडके, वय 25 वर्षे, रा. संत कबीर नगर, अकोट फईल, अकोला हे चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरून ते ट्रेन खालती पडणार तोच तिथे उपस्थित असलेले जीआरपीएफ पोलीस कर्मचाऱ्यांरी अरूण चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून त्यांना वेळेत बाजूला खेजल्याने सदर प्रवाशाचे प्राण वाचले. पोलीस हवालदार अरुण चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचलेले जीआरपीएफ पोलीस हे नेहमीच सतर्क असल्यामुळे बऱ्याच प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.पोलीस हवालदार अरुण चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.