अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची 7 वर्षांपासून दयनीय अवस्था आहे. या रस्त्याच्या खराबीमुळे अनेक अपघात सुद्धा घडले आहेत. या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी घोषणाही करण्यात आली, तरी शासनाने याकडे दूर्लक्ष केल्याने उबाठा गटाचे नगरसेवक मंगेश काळे मित्र मंडळाच्यावतीने शासन, प्रशासनास, जनप्रतिनिधींना जागे करण्यासाठी तुकाराम चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत हा रस्ता नव्याने तयार केला जात नाही. तो पर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आलाय.