शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम विदर्भ प्रमुख पदी अमित गजाननराव वरणकार यांची निवड
पश्चिम विदर्भ च्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख पदी अमित गजानाराव वरणकार यांची निवड करण्यात आल्या ची घोषणा रामहरी राउत कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंगेश चिवटे माझी कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या मार्गदर्शाना ख़ाली ही नियुक्ती करण्यात आली. अमित वरणकार हे युवा नेतृत्व असुन रुग्णां करिता अहोरात्र झटत असतात तसेच विविध सामाजिक उपक्रम रबवित असतात. रोज़गार मेळावा,रक्तदान शिबीर, महिला सक्षमिकरण, धार्मिक कार्याच आयोजन करत असतात. समाजातील शेवटचा घटक उपचारा पासून वंचित न राहो या साठी त्यानी गरजुचे रक्त दाते ही संस्था निर्माण केली त्या अंतर्गत रुग्णांची यथा शक्ति सेवा करण्याच कार्य करत असतात. याच निस्वार्थ कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी अमित वरणकार यांची पश्चिम विदर्भ प्रमुख पदी वर्णी लावली आहे. या पदाची गरिमा जोपासन्याची ग्वाही अमित वरणकार यांनी दिली.