स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद  

स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद पाटबंधारे विभागाचा इशारा

अकोला, दि. 29 : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांनी वेळेवर पाणीपट्टीचा भरणा न केल्याने थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. किमान 50 टक्के रक्कम तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा अकोला पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची मार्च 2024 पर्यंत 28 कोटी 24 लक्ष 83 हजार रू. आकारणी होत असून, केवळ 2 कोटी 62 लक्ष 68 हजार रू. वसुली झाली आहे. मार्च 2024 पर्यंत 25 कोटी 62 लक्ष 15 हजार रू. इतकी आकारणी अपेक्षित आहे. पाणीपट्टी भरणा करण्यास जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान 50 टक्के पाणीपट्टी भरणा करावा अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 अन्वये पाणीपुरवठा बंद करण्यात येईल व संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील, असा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. खु. वसुलकर यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news