राज्यभरात भारतीय जनता युवा नमो चषकच्या माध्यमातून युवाशक्तीला संघटित व एकत्रित करून !
अकोला देशी खेळांना वाव देण्यासाठी व प्रत्येकाच्या कर्तुत्वाचा त्यांच्या गुणाचा वापर समाज हित राष्ट्रहित सोबत परिवारा च्या कल्याणासाठी व्हावा व शारीरिक क्षमता सोबत मानसिक विकास व्हावा याकरिता व्यापक दृष्टिकोन ठेवून राज्यभरात भारतीय जनता युवा नमो चषकच्या माध्यमातून युवाशक्तीला संघटित व एकत्रित करून देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या नाळ जोडण्याकरिता विविध स्पर्धा आयोजित केली आहे आणि अकोला पश्चिम पूर्व विधानसभा मतदारसंघातील युवाशक्ती मोठ्या संख्येने प्रत्येक खेळामध्ये भाग घेत आहे हे स्पर्धेचे यश असल्याची प्रतिपादन अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी केले स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे खो खो वॉलीबॉल रेसिंग स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा भाजपा प्रमुख अनुप धोत्रेहे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून, पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमुख विजयजी अग्रवाल,जिल्हाअध्यक्ष किशोर मांगटे पाटील,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, कृष्णाजी शर्मा , युवा मोर्चा महानगर अध्यक्ष पवन महल्ले, राजेंद्र गिरी, प्रकाश घोगलीया , चंदाताई शर्मा,व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अकोला पूर्व आणि पश्चिम मधील टीमचे स्वागत अनुप धोत्रे यांनी केले व यावेळी किशोर पाटील यांनी टीमला शुभेच्छा दिल्या विजय अग्रवाल यांच्या नियोजनाखाली अकोला पश्चिम तर आमदार रणधीर सावरकर यांच्या नियोजनाखाली अकोला पूर्व च्या स्पर्धा सुरू असून पन्नास हजार पेक्षा जास्त युवाशक्ती स्पर्धेच्या माध्यमातून जोडण्याचं काम होत असून यावेळी महात्मा गांधी यांना आदरांजली अनुप धोत्रे यांनी देऊन महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा प्रचार प्रसार व त्यांच्या विचारसरणीने त्याला प्रगतीपथावर नेत असल्याचीही त्यांनी सांगितले. संचालन पवन महाले तर प्रास्ताविक सुमनताई गावंडे तर आभार प्रदर्शन गणेश पावसाळे यांनी केले यावेळी चंदा ठाकूर, जानवी डोंगरे सागर शेगोकार राहुल देशमुख संजय झाडोकार, निकिता देशमुख मिलिंद राऊत प्रशांत अवचार विजय इंगळे अजय शर्मा मुस्कान पंजवानी हरिभाऊ काले मोहन पारधी अक्षय जोशी यश सीकरीया प्रकाश धोगलीया आशिष पवित्रकार बाल टाले हरीश अलीम चदाणी, संजय बडवणे मंगला सोनवणे धनंजय धबाले हरीश काळे गीतांजली शेगोकार सिद्धार्थ शर्मा संजय गोटफोडे आम्रपाली उपरवट, एडवोकेट देवाशिष काकड रमेश अल्करी संदीप गावंडे गणेश अंधारे संतोष पांडे निलेश निनोरे रमेश करिहार, एडवोकेट कुणाल शिंदे, आधी उपस्थित होते.