अखेर महाविकास आघाडी चा मुहूर्त निघाला ॲड प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी मध्ये सामील व्हायचे निमंत्रण!

अखेर महाविकास आघाडी चा मुहूर्त निघाला ॲड प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी मध्ये सामील व्हायचे निमंत्रण!

अखेर महाविकास आघाडी चा मुहूर्त निघाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे अशी भूमिकेची मीटिंग. आज दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली सदर निमंत्रणामध्ये खालील उल्लेख करण्यात आला आहे.

देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत, वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे. सदर निमंत्रण पत्रिकेमध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस . जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस . संजय राऊत, शिवसेना नेते यांच्या साक्ष आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर हे काय भूमिका घेतात काकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news