छत्रपतीचा अवमान करण्याचे दुसाहस करणाऱ्या विद्यार्थावंर गुन्हे दाखल करा!
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी!
अकोल्यातील होमिओपॅथी कॉलेजमधे दि. २८ जानेवारी २o२४ पासून स्नेहसंमेलन सुरू झाले होते, दि. ३० जानेवारी रोजी शेवटच्या सत्रामध्ये प्रथम वर्षीय मुलांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पोवाडयावरही इतिहासामध्ये असलेला अफजलखानाचा वध हे जिवंत दृष्य सादर केले . त्यांनतर त्याच कॉलेजमध्ये तृतीय वर्षालाअसलेल्या गैरहिंदू समाजातील काही विद्यार्थी यांनी या दृष्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असा कांगावा करीत काहीबाहेरील मुलांना तिथे बोलावून देखावा सादरीकरण केलेल्या मुलांना दमदाटी करुन त्यांना स्टेजवर बोलावून त्यांना जाहिर माफी मागायला लावली. या सर्व घटनेमाघे हा विषय भडकवण्यामध्ये कॉलेज मधील दोन मुलींचा प्रामुख्याने सहभाग होता असे समजले, त्यांची नावे सुद्धा समोर आली आहेत.
ज्याच्यांमुळे महाराष्ट्र घडला अशा छत्रपतीचा अवमान करण्याचे दुसाहस करणाऱ्या विद्यार्थावंर गुन्हे दाखल करुन त्यांना कॉलेज मधून बडतर्फ करण्याची मागणी आज अकोला शिवसेनेच्या वतीने होमिओपॅथी कॉलेज प्राचार्य.डॉ.संजयकुमार तिवारी यांना भेटून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.