राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची झालेल्या चौकशीचा अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध!
राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची झालेल्या चौकशीचा अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. दरम्यान रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारण्यात आलं. या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर जोरदार घोषणाबाजी केली आहे. विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. त्यामुळ सरकारनं भीतिपोटी ईडीमार्फत चौकशी लावल्याचा आरोप केलाय.