पातूर शहरांत चोरीचे सत्र सुरूच?
घरफोड्या बरोबर वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ?
पातूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ तर नागरीकांच्या मनात चोरट्यांची भिती?
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातुर शहरातील बंजारा नगर, महात्मा फुले नगर , या नगरात काही दिवसापूर्वी लागोपाठोपाठ घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत,या चोरीचा ओलावा अजून पर्यंत पुसला नाही तर पातुर शहरात वाहनाची चोरी व या नगरातील घरांन मंध्ये झालेल्या चोरी मधिल मुद्देमालांचा अजून पर्यंत कुठलाही शोध लागला नाही, चोरांचे मनोबल वाढत आहे, त्याला कारणीभूत कोण? होत असलेल्या चोरीच्या घटना या कळे वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे पातुर शहरात उशिरा रात्री घडलेली घटना 31 जानेवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे पातुर येथील कशीद पुरा येथील रहिवासी असलेले माजीद खान सरफराज खान यांच्या मालकीची असलेली मारुती सुझुकी कंपनी असलेली पांढऱ्या रंगाची आर्टिका नामक चार चाकी गाडी क्र. एम एच 30 ऐ झेड , 2333. क्रमांक असलेली गाडी हि आरिफ नगर येथुन चोरीला गेली अशी तक्रार गाडी मालक माजीद खान सरफराज खान यांनी पातूर पोलीस स्टेशन येथे केली आहे , अज्ञात चोरा विरोधात पातुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे या सर्व चोरीच्या घटनेचा तपास सखोल करून चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येईल का ? चोरीच्या घटनांमध्ये मोठी कारवाई होत नसल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे अशी चर्चा पातुर परीसरात सुरू आहे यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्व पातूर वाषियांचे लक्ष वेधले आहे,
ठाणेदार किशोर शेळके
या प्रकरणात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर शोध मोहीम लवकरच करण्यात येईल.
गणेश बोचरे
भारतीय सैनिकमी भारतीय सैनिक म्हणून मुंबई येथे ब्लॅक कॅट कमांडो म्हणून कार्यरत असून माझे घर हे महात्मा फुले नगर पातुर शिलाऀ ग्रामपंचायत हद्दीत आहे काही महिन्यापूर्वी माझ्या घरी चोरी झाली असून अजून पर्यंत कुठलाही शोध लागला नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या चोरीची माहिती विचारली असता कुठलही चोरीचे गुड उघडकीस आले नाही मी देशाचा एक सिपाई असून माझ्या घराचे रक्षण कोण करणार असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे?