ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पातुर तहसीलदार यांना निवेदन
उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो!
सर्व ओबीसींना जागृत करण्यासाठी सोशल मीडिया द्वारे ओबीसी ना आव्हान करण्यात आले तर यावेळी संभाजी चौक येथील महात्मा फुले स्मारक येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पातुर तालुक्यातील व शहरातील ओबीसी यांनी शासकीय अध्यादेशाच्या विरोधात निवेदन दिले आहे यावेळी पातुर शहरातील महात्मा फुले स्मारक येथे ओबीसी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व वूठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो, फुले, शाहू ,आंबेडकर, या हुतात्म्यांच्या नावाची गर्जना करत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नारे बाजी करण्यात आली. तर पातुर तहसीलदार मा. रवि काळे यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही अशी भूमिका शासनाच्या दरबारात मांडावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली शासनाने काढलेल्या ओबीसी आरक्षण अध्यादेशा विरोधात ओबीसींच्या आरक्षणाला वाचवण्यासाठी भारतीय ध्वज घेऊन पातुर तहसील कार्यालयावर ओबीसी समाजातील लोकांनी हजेरी लावली आहे शासनाने ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समता परिषदेचे जेष्ठ नेते गजानन इंगळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे तर यावेळी गजानन इंगळे,सुरेद्र उगले,परशराम उंबरकार, डॉ सुनील आवटे, प्रदिप काळपांडे,विजय बोचरे आलेगाव, श्रीधर लाड, मनोहर उगले, संदिप गिरे, गजानन येणकर, गौरव काळपांडे, संजय पाटील, मोहन गाडगे,बाळू भाऊ गाडगे, प्रशांत निमकंडे, विनायक वानखडे, किशोर फुलारी , प्रविण इंगळे, ज्ञानेश्वर राखोंडे, रवि ताले, राम उगले, निखिल इंगळे, अंबादास देवकर, यांच्या सह ओबीसी समाजातील नागरिकांची उपस्थिती होती