म.न.पा मुला मुलींची शाळा क्र.१८ येथे संविधानाची उद्देशिका भेट देऊन जनजागृती कार्यक्रम संपन्न
अकोला. २. संविधान जनजागृती कार्यक्रमाचे म.न.पा मुला मुलींची शाळा क्रमांक १८ येथे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांसोबत व विद्यार्थ्यांशी संविधाना विषयी चर्चा करण्यात आली. संविधानाचे महत्त्व आणि संविधानाची उद्देशिका भेट देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
नागरिकांना आपले हक्क, अधिकार , कर्तव्य व शिक्षणाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. तेव्हा आज नागरिकांना हक्का विषयी माहिती, अधिकारांचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले सोबतच नागरिक म्हणून आपले कर्तव्य सुध्दा बजावले पहिजे आणि त्यासाठीच संविधानाचे ज्ञान असेल पाहिजे ते ज्ञान आपल्याला शिक्षणातून मिळते. त्याकरिता आपण शिक्षणं घेतले पाहिजे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय राऊत यांनी व्यक्त केले. सोबातच संविधान आपल्यासाठी किती महत्वाचे आहे यावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संविधानाचे प्रचाराक आकाश पवार यांनी प्रकाश टाकला. गौरी सरोदे यांनी महिलांशी संवाद साधत आपण आपले जीवनमान संविधानाचा आधार घेतल्याशिवाय उंचविणार नाही. या साठी विद्यार्थ्यांच्या कल्पकता व शिक्षणावर पालकांनी जोर दिला पाहिजे. त्यामधूनच येणारी पिढी घडेल या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षय राऊत, प्रमुख अतिथी आकाश पवार, गौरी सरोदे, रश्मी गावंडे, प्रगती सरोदे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.सुकन्या भा.साबळे, प्रकाश लगड, हरिदास चव्हाण , माया दुर्गे व आकाश इंगळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.