पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांची प्रभावी पेट्रोलींग व प्रतिबंधक कार्यवाहीवर भर!

पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांची प्रभावी पेट्रोलींग व प्रतिबंधक कार्यवाहीवर भर!

पोलिस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन वर्दळीचा ठिकाणी नव्याने प्राप्त १६ बाइक व्दारे विशेष पेट्रालींग, संवेदनशिल

ठिकाणी फिक्स पॉईंट, अॅन्टी दरोडा पेट्रोलिंग, पायी पेट्रोलींग, दामीनी पथक पेट्रालींग वर भर – निवडणूकीचा पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एम. पी. डी.ए., तडीपारी इ. प्रतिबंध कारवाई वर भर

– महीण्याभरात गुन्हा शोध, दोषसिध्दी, प्रतिबंधक कार्यवाही यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ६९ पोलीस अधीकारी, अमंलदार यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव

पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांनी अकोला जिल्हयातील सर्व ठाणेदार यांची पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला येथे दिनांक ०२.०२.२०२४ रोजी मासीक गुन्हे आढावा बैठकीत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या गुन्हयांचा आढावा घेतला. शहरात व ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर आळा बसावा व महीला व मुली तसेच विदयार्थी यांचे मध्ये सुरक्षितेची भावना वाढावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस मदत मिळावी आणि सर्व सामान्य जनतेमध्ये पोलीसांची प्रतिमा चांगली व्हावी या करीता पोलीस अधिक्षक अकोला यांनी २४ नविन मोटर सायकली प्राप्त करून घेतले. तसेच शहरामध्ये संवेदनशिल ठिकाण निश्चीत करून त्याठिकाणी ०५ मोटार वाहन फिक्स पॉईंट लावण्यात आले. तसेच दरोज सकाळी ०६.०० ते ०९.०० व सायंकाळी ०६ ते ११. ०० वाजे दरम्यान नव्याने प्राप्त अत्याधुनिक मोटार सायकल व्दारे विशेष पेट्रोलिंग सुरू करण्यात आली, शहर व ग्रामीण भागातील सर्व ठाणेदार यांना पोलीस स्टेशन हद्दीत टवाळखोरांना आळा घालण्यासाठी दामीनी पथक पेट्रोलीग करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच दररोज संध्याकाळी ०७ ते १०.०० वा. दरम्यान पोलीस अधिकारी/अमंलदार यांची पायी पेट्रोलींग व ०६. ते १०.०० वाजे पावेतो बाईक पेट्रोलींग प्रभावीपणे करण्या बाबत आदेशित केले. तसेच शहरात व ग्रामीण भागात जास्तीत जास्त पोलीस अमंलदार लावुन प्रभावी पणे रात्रगस्त करण्या बाबत आदेशित केले आहे. तसेच नव्यानेच अन्टी दरोडा पेट्रोलिंग कामी ०२ वाहनांची नेमणुक करण्यात आली. डायल ११२ हि योजना प्रभावी पणे राबविण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व ठाणेदार यांना गुन्हेगारीचे वृत्तीचे लोकांन विरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए. तडीपार, ईतर प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्या बाबत आदेशित केले. तसेच अकोला जिल्हयात जानेवारी २०२४ मध्ये गुन्हा शोध, दोषसिध्दी, प्रतिबंधक कार्यवाही यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ६९ पोलिस अधीकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.

दामीनी पथक पेट्रोलींग मुळे विशेषता महीला व मुलींन मध्ये सुरक्षितेची भावना तसेच विदयार्थामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होवुन मुली व महीला विषयी होणारे गुन्हयांना प्रतिबंध होईल. पायी पेट्रोलींग व गरूडा बाईक पेट्रोलींग, व रात्रगस्त गस्त पेट्रोलींग मुळे गुन्हेगारीला आळा बसुन प्रतिबंध होणार आहे. व जनतेस पोलीसांचा जलद प्रतिसाद मिळण्यास मदत होईल. जनता व पोलीस यांचे संबंध वृध्दींगत होण्यास मदत होणार आहे. पोलीसांच्या या पेट्रोलिंग व ईतर उपक्रमांचे जनतेतुन स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news