हिंदू दलित समाजातील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देऊन मुलीला व कुटुंबीय न्याय द्यावा!

हिंदू दलित समाजातील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देऊन मुलीला व कुटुंबीय न्याय द्यावा!

पीडित मुलीला व कुटुंबीयास शासनाने तातडीने वीस लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची मागणी – संजय गोतरकर

जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर/ अकोला : लातूर जिल्ह्यातील हिंदू दलित खाटीक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची कठोर शिक्षा देऊन पीडित मुलीला व कुटुंबीयास न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना यांना 30 जानेवारी 2024 रोजी 2024 रोजी हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ व सतुर सेना तसेच जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

हिंदू दलित खाटीक समाजाच्या वतीने समाजातील झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी हिंदू दलित खाटीक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येते की खाटीक समाजाची मुलगी सहा वर्षीय मुलगी तिच्यावर आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी राहणार वलांडी हिच्या घराशेजारी बावीस वर्षीय विवाहित इसमाने 15 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत सतत पाच दिवस चिमुकली स्वतःच्या घरी नेऊन अमानुषपणे अनैसर्गिक रित्या कृत्य करून अत्याचार केला.
तसेच तू जर घरी कोणाला याबाबत सांगितले तर मी तुला जिवंत मरून टाकेल अशी पीडित मुलीला आरोपी धमकी देत होता. मुलगी ही हिंदू दलित खाटीक समाजाची असून तिचे वडील मृत्यू पावलेले आहेत तिच्या कुटुंबाची जबाबदारी तिची आई मोलमजुरी करून संसाराचा उदरनिर्वाह गाडा झोपडीच्या घरात राहून चालविते.
तिला तीन बहिणी व एक लहान भाऊ तसेच एक आजी अपंग आहे हे सर्व शांत प्रिय व गरीब कुटुंब आहे.
शासनाने तातडीने या प्रकरणात विशेष लक्ष देऊन फास्टट्रॅक न्यायालयाद्वारे या नराधमास फाशीची कठोर शिक्षा देऊन पीडित मुलीला व तिच्या परिवाराला योग्य न्याय व आर्थिक मदत मिळून देण्यात यावी यासाठी हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ व जिल्ह्यातील सर्व खाटीक समाज बांधव व संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना 30 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देतेवेळी संजय धनाडे गोपाळ कंटाळे भागवत पवार अरुण खिरडकर बाळासाहेब मंडवे गजानन म्हैसणे संतोष डोफे संजय गोतरकर बाळासाहेब हरणे पवन पवार सतपाल एललकार मंगेश माकोडे ऊमेश दुर्गे संतोष मसनकार तसेच रवी कराळे गुलाब गोतरकर विजय खिरडकर गजानन विरेकर देवानंद हिवराळे नर्मदाबाई मांडवे सीमाबाई पवार सतीश कराळे विश्वनाथ हिवराळे विरेश ढोके गोपाल विल्हेकर विष्णु ढोके गोपाल गोतरकर नितीन राहुळकर विजय गोतरकर अर्जुन लसंनकार गोविंदा राहुलकर अशोक गुजर नरेश गोतरकर राजकुमार पवार विकी मांडवे यांच्यासह मोठ्या संख्येने खाटीक समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील या घटनेचा जाहीर निषेध जिल्हयातील हिंदू दलित खाटीक समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपीला तातडीने कठोर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व पीडित मुलीला व कुटुंबीयास 2o लाख रुपये भरीव शासकीय आर्थिक मदत तातडीने मिळाली पाहिजे . हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे त्यासाठी जिल्ह्यातील खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय गोतरकर
(सामाजिक कार्यकर्ते)
पातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news