शहरातील पोलीस विभागातर्फे रुटमार्च!
अकोला शहर अती संवेदनशिल म्हणुन ओळख आहे शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, आगामी सन उत्सव व सार्वत्रिक निवडणुका शांततेत व निर्भिड वातावरणात पार पाडावा तसेच RAF (शिघ्र कृती दल) B कंपनी १०७ बटालीयन यांना शहरातील संवेदनशिल व अतिसंवेदनशिल परिसराची माहिती व्हावी याकरीता दि.०३.०२.२०२४ रोजी सायंकाळी १७.२० ते १८.३० वा पावेतो पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे नेतृत्वात RAF (शिघ्र कृती दल) यांचा शहरात खालील मार्गाने रुटमार्च काढण्यात आला होता.
सदर रूटमार्च मध्ये मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक सा. अकोला, मा. श्री. अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक सा. अकोला, श्री. सतिश कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी श.वि. अकोला, श्री. अमनकुमार सहा. कमांडन्ट RAF तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह RCP प्लाटुन & QRT तसेच पो.स्टे. मधील अंमलदार असे एकुण २० अधिकारी + ३१० कर्मचारी सहभागी झाले होते.रूटमार्च मार्ग :- चांदखा प्लॉट येथुन प्रारंभ होवुन हरिहरपेठ सप्तश्रृंगी देवी मंदीर, किल्ला चौक, पोळा चौक, तुराबअली मरिजद समोरून, गंगाधर चौक, जयहिंद चौक, अगरवेस, दगडीपुल चौक, मामाबेकरी चौक, अकोट स्टॅण्ड चौक, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, ताजनापेठ पो. चौकी, मोहम्मद अली रोड, फतेह चौक, चांदेकर चौक, गांधी चौक, कोतवाली चौक मार्गे गणेश घाट येथे विसर्जन.(शिघ्र कृती दल) B कंपनी १०७ बटालीयन यांचे अकोला जिल्हयात खालील ठिकाणी रूट मार्चचे आयोजन केले आहे. खालील ठिकाणी रूट अकोट. ४ फेब्रुवारी बाळापुर 5 फेब्रुवारी. .मुर्तीजापुर. सहा फेब्रुवारी. पातुर सात फेब्रुवारी. बार्शीटाकळी 8 फेब्रुवारी.रुटमार्च काढण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांना केव्हाही पोलीसांची मदत लागल्यास डायल ११२ वर कॉल केल्यास त्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येते. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी अकोला शहर व जिल्हयात Visible Policing आणि Crime Prevention अनुषंगाने शहरात सकाळी ०६.०० ते ०९.०० या वेळेत गुड मॉर्निंग पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट आणि सायंकाळी १८.०० ते २३.०० यावेळेत, जिल्हयातील सर्व पो.स्टे. परिसरामध्ये १६ मोटर सायकलव्दारे या विशेष पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे.