पोलीस अधीक्षकांनी साधला जिल्हयातील विविध शाळेच्या मुख्याधापका सोबत संवाद…
अकोला पोलीस दला तर्फे विदयार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना बाबत चर्चा सत्राचे आयोजन
अकोला शहर हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असून अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, कांदेशा है. जिल्हयातुन अनेक विदयार्थी शिक्षण घेणेकरीता दरवर्षी हजारोच्या संख्येने अकोला शहरात दाखल होतात, ते विदयार्थी याठिकाणी खाजगी निवासस्थान किंवा वसतीगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचे सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०३.०२.२०२४ रोजी ११.०० वाजता विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे शहरातील तसेच जिल्हयातील शाळा मुख्याध्यापक यांचे सोबत विदयार्थी सुखरा या विषयावर वर्वासत्राचे आयोजन करण्यात आले होते सदर चर्चा सत्रामध्ये विवयायी सुरक्षा संबंधाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
वर्चासत्रामध्ये उपस्थित मुख्याध्यापक यांनी आपला परिचय देत त्यांनी विदर्याच्यांच्या सुरसे संबंधी समस्या मांडल्या,
त्यानंतर पोलीस अधीक्षक अकोला यांनी सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानी विदयाथी सुरक्षा ही पोलीसांची पहीली प्राथमिकता असुन, याबबत अकोला पोलीस दलातर्फे विदयार्थी सुरक्षीततेच्या दृष्टीने विवीध उपाययोजना केल्याचे सांगीतले. यामध्ये अकोला शहरात दामिणी पथका तसेच पोस्टे बिट मार्गल व पेट्रोलींग मोबाईल यांनी शाळा सुटण्याच्या वेळेवर पोलीस स्टेशन हवदीतील शाळा कॉलेज या ठीकाणी सर्तक पेट्रोलींग करून वाहतुक नियोजन करावे तसेच शाळेला भेट दयावी, ठाणेदार यांनी आपल्या पोलीस स्टेशन हददीतील शाळा कॉलेज यांची यादी तयार करून आठवडयातुन प्रत्येक शाळेला भेट देण्याचे नियोजन करणे तसेब विदयार्थी सोबत संवाद साधुन त्यांच्या शंका कुशंकांचे नीवारण करणे ठरणे प्रभारी तसेच दामिणी पथक हे शाळा, कॉलेज, टयूशन क्लासेस, निर्जन स्थळी पेट्रोलीग करून टवाळवीर मुलांवर प्रतिबंधक कार्यवाही करतील. धर्मा दरम्यान असे निदर्शनात आले कि १८ वर्षा खालील मुले शाळेला दुचाकी वाहणे घेवुन येतात त्यावर प्रतिबंध व्हावा याकरीता वाहतुक शाखा यांनी विशेष मोहीम राबवुन रोज वेगवेगळ्या शाळा परिसरात वाहनांची तपासणी करावी तसे आढळून आल्यास मुलांच्या पालकांशी संवाद साधुन त्यांना समुपदेशन करावे, मुलांच्या मनातील पोलीसांची भिती दुर करण्याकरीता विदयार्थी संवाद, चर्चासत्र, तसेब शाळा भेटी, SELFIE WITH STUDENT हा उपक्रम राबवीने पोलीस व शाळा यांचा समन्वय साधण्याकरीता शाळा व्यवस्थापक व पोलीस स्टेशन प्रभारी यांचा शॉट्स अप ग्रुप तयार करून त्यावर वेळोवेळी जनजागृती पोस्टर, सुचना पत्रक, व्हिडीओ, तसेब, सुरक्षा संबंधाने माहिती पत्रक शेअर करावे शाळा व्यवस्थापक, विदयार्थी यांच्यात समन्वय साधावा अशाप्रकारे पोलीसांनी उपाययोजना केल्याचे सांगीतले. सदर कार्यकमाच्या दरम्यान हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याबाबत पोस्टरचे विमोचन करण्यात आले. सदरचे पोस्टर हे नवकांती शीक्षक संघटनेचे उमेश म्हसाचे अकोट यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आले होते.
सदर चर्चा सत्राकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्ला शिक्षणाधिकारी श्रीमती सुमिता पाटेकर, व जील्हयातील सुमारे ८० शाळेचे मुख्याध्यापक व शालेय प्रतीनीधी यांची उपस्थिती होती.