हातात शस्त्र घेवुन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार दहिहांडा पोलीसांचे ताब्यात.
प्रतिनिधीःदिपक भांडे
दिनांक ०३/०२/२०२४ रोजी रात्री ११/३० वा चे सुमारास दहिहांडा ते कुटासा रोडवर एक ईसम हातात शस्त्र घेवुन रस्त्याने फिरत आहे अशी माहिती पोका रामेश्वर भगत यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ठाणेदार योगेश वाघमारे यांना माहिती दिली. ठाणेदार योगेश वाघमारे यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री अनमोल मित्तल साहेब यांना माहिती देवुन एक पथक नेमुन दहिहांडा ते कुटासा रोडवर शोध घेतला असता इंडेन गॅस एजेन्सी जवळ एक ईसम हातात धारदार चाकु घेवुन रस्त्यावर फिरत असतांना दिसला. तात्काळ दोन पंच बोलावुन त्याला ताब्यात घेण्यात आले व त्याचे विरुध्द कलम ४.२५ आर्म अॅक्ट अन्तरों पो स्टे दहीहांडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव योगेश शंकर गुजरकर वय २७ वर्ष रा अरविंद कॉलनी अकोट असे असुन त्याचा पुर्व ईतिहास पाहता तो एक सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब, सह पोलीस अधिक्षक श्री अनमोल मित्तल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश वाघमारे, एएसआय अरुण घोरमोडे, पोहेका नंदकुमार चोपडे, पोहेका सुधीर कारेडे, पोहेका शरद सांगळे, नापोका राजेश वायधने, पोकों रामेश्वर भगत, पोकों प्रफुल दिंडोकार यांनी केली