अकोला सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी चर्चे दरम्यान अंगावर डीझल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला,
त्यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर अनर्थ टळला, आणि अधीक्षक अभियंता यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता खराब असल्याने मंगेश काळे आणि मित्र परिवार गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र या आठ दिवसात एकही अधिकारी उपोषण मंडपात फिरकला नसल्याने, आज अधीक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्ते कार्यालयात गेले होते यावेळी मंगेश काळे यांनी चर्चेत रस्त्याचा तोडगा निघत नसल्याचे पाहून अंगावर डिझेल घेऊन दलनातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार आणि कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्यान अनर्थ टळला, आणि अधीक्षक अभियंता यांनी वर्क ऑर्डर काढून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतरही काम न झाल्यास पुन्हा आत्मदहन करेल असा इशारा मंगेश काळे यांनी दिलाय.