चौहट्टा बाजार परीसरात एकाच दिवसात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!
अकोट तालुक्यातील दहिहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चौहट्टा बाजार परीसरात एकाच दिवसात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतकांची माहिती मिळतात घटनास्थळी दहिहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतकांचे पंचनामे सुरू असून. चौहट्टा बाजार येथील पुलाजवळ कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.सदर सदर इसमाचा संशयात पद मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. तर याच परिसरातील पानेट रस्त्यावर आणखी एक मृतदेह आढळला असून सदर मृतकाचे नाव निलेश राणे असून हा रोहना येथील रहिवासी असून सदर मृतका जवळ कीटकनाशक औषधीचा डबा मिळून आला असून त्यासोबतच एक घरगुती चाकू सुद्धा मिळून आल्याची माहिती प्राप्त सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. दोन्हीही मृतदेहकांचे पंचनामे सुरू असून पुढील तपास दहिहंडा पोलीस करीत आहेत.